मा.श्री. हुलगेश चलवादी -
सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज, तळागाळातील जनतेसाठी सतत काम करणारे, समाजसेवक, राजकीय नेते, यशस्वी उद्योजक, पुणे इंटरनॅशनल स्कुल व ज्यु कॅालेज या नामांकित स्कुलचे संस्थापक चेअरमन, पुणे महानगरपालिकेचे मा. नगरसेवक मा.श्री. हुलगेश भैय्या चलवादी यांचा हे बहुजन समाज पक्षाचे पुणे शहर व जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यररत आहेत.
Born To Serve आणि संकल्प जनसेवेचा ही ब्रीदवाक्य मनी बाळगून काम करणारे हुलगेश भैय्या म्हणजे, एक सेवाभावी, अनुभवी, अभ्यासू, शांत, संयमी, उच्चशिक्षित, सुसंस्कृत, कार्यक्षम, कार्यमग्न, वक्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आदी गोष्टींचा संगम असणारे थोर नेतृत्व व समाजसेवक आहेत. नेहमी सर्वांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून हुलगेश भैय्या चलवादी यांचा पुणे शहरात परिचय आहे. ‘सेवा परमो धर्मो’ हीच त्यांच्या कार्याची प्रेरणा आहे. चांगले विचार मनी ठेऊन अभ्यासपूर्वक दुरदृष्टी ठेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. बोलण्यात नेहमी सत्यता, कोणाविषयी कटुता न बाळगता आणि भ्रष्ट आचरण न करता आपले साधे, सरळ व स्वच्छंदी जीवन जगणारे हुलगेश भैय्या यांचे आकर्षक व्यक्तिमत्व आहे. स्वभावातील मुदूपणा, प्रेम, स्नेह, विनम्रता यामूळे त्यांच्या संपर्कात आलेला कोणताही व्यक्ती त्यांच्या गळ्यातील ताईत झाल्याशिवाय राहत नाही. असे हुलगेश भैय्या यांचे सर्वांना आपलेसे आणि हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या विचारांना स्वयंम प्रेरणेने अनुसरून हुलगेश भैय्या यांनी आपल्या सामाजिक, राजकीय जीवनाची सुरुवात केली. छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांकडून त्यांना समाजकार्याची आवड आणि प्रेरणा मिळाली. तोच वारसा घेऊन ते वाटचाल करित आहेत.
हुलगेश चलवादी यांचे बालपण खूप हलाखीत गेले. पुणे शहरातील इंदिरानगर या झोपडपट्टीत त्यांचा जन्म झाला. त्यामुळे गरिबीचे चटके काय असतात हे त्यांना चांगलेच माहीत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा जिथे पूर्ण होऊ शकत नाही. तिथे शिक्षण घेणे ही चैनच ! अशा बिकट आणि संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी स्वतःची वाटचाल केली आहे. जणू काही परिस्थितीशी संघर्ष करण्याचे बाळकडूच भैय्यांना यातून मिळाले. त्यांचे वडील मरिअप्पा चलवादी हे अशिक्षित होते. तरीही त्यांच्या वडिलांनी भैय्या यांना कॅान्व्हेंट शिक्षण संस्थेतून शिक्षण दिले. शिक्षणाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचवावे अशी त्यांच्या वडिलांची तीव्र इच्छा होती. वडिलांची ही इच्छा हुलगेश भैय्या यांनी पूर्ण केली आहे. तळागाळातील मुलांनाही कॉन्व्हेंट मिडियमचे शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी पुणे इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. गरीब घरातील अनेक मुले आज या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. शिक्षणच आपली प्रगती करू शकते हे जाणून केवळ विचार न करता कृती करणारे असे भैय्या यांचे कृतिशील व्यक्तिमत्व आहे.
भारतीय संविधानाविषयी भैय्या यांची अपार श्रद्धा आहे. त्या श्रेद्धेतून ते नागरिकांना भारतीय संविधान हा ग्रंथ भेट देत असतात. संविधान भेट देण्याचा उपक्रम राबविणारे ते कदाचित एकमेव व्यक्ती असावेत. या उपक्रमातून भैय्या यांची संविधानवर किती निष्ठा व प्रेम आहे हे दिसून येते.
स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हरित पुणे हि संकल्पना त्यांनी यशस्वीरित्या राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या कोरोना महामारीमध्ये हुलगेश भैय्या यांनी घरोघरी जाऊन अन्नधान्य व किराणा किटचे वाटप केले, मास्क, सॅनिटायझर, अर्सेलिक अल्बम गोळ्या याचे ही मोठ्या प्रमावार वाटप केले. विशेष म्हणजे, लॅाकडाऊन काळात सर्वत्र बंद असल्याने रस्त्यांवरील कुत्री, मोकाट जनावरे यासारख्या प्राण्यांच्या मुत्यूचे प्रमाण वाढले होते. ही गोष्ट भैय्या यांच्या लक्षात येताच, त्यांनी लॅाकडाऊनच्या काळात मुके जनावरे व प्राणी यांना अन्न पुरविले. यातून हुलगेश भैय्या हे किती संवेदनशील आणि हळव्या मनाचे राजकीय नेते आहेत हे आपल्याला दिसून येते. स्पर्धा परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत अत्याधुनिक अभ्यासिका व ग्रंथालय सुरु केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती, विद्यार्थी व नागरिकांकरिता ते सतत नवनवे फायदेशीर उपक्रम राबवित असतात. व्यवसायातील वेगवेगळ्या कंन्स्ट्रक्शन कंपनींच्या माध्यमातून समाजातील अनेकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. विविध धर्मियांमध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळविलं आहे. मंदिरे, चर्च, मस्जिद, दर्गा, गुरुव्दार व विहार आदी धार्मिक स्थळे बांधून सर्वसमाजात एकता व एकात्मतेचा संदेश त्यांनी दिला आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी हुलगेश भैय्या यांच्या ऑफिसचे दरवाजे सतत खुले असतात. जनतेच्या दु:खावर फुंकर घालणारे व सेवा हाच आपला धर्म म्हणून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून हुलगेश भैय्या चलवादी यांचा सर्वांना परिचय आहे.
हुलगेश चलवादी यांनी माजी नगरसेवक, पुणे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष, महिला व बाल कल्याण समितीचे माजी सदस्य, शहर विकास समितीचे माजी सदस्य, माजी सैनिक समितीचे प्रवक्ते, विशेष कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर काम करताना अनेक कामे मार्गी लावली आहेत. प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्यांची कामे करून घेण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सामान्यांच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण करण्यासाठी ते अहोरात्र कार्यररत आहेत.
घरातून लहानपणापासूनच समाजकार्याची आवड आणि वडिलांच्या विचारांचा वारसा यामूळे ते गेली तीस वर्षाहून अधिक सार्वजनिक जीवनात काम करित आहेत. कला, क्रिडा, साहित्य,शिक्षण, शेती, आरोग्य,सामाजिक, व्यवसायिक, आर्थिक,राजकीय, विधी व न्याय आदी क्षेत्रात सहजतेने आणि कार्यक्षमपणे कार्यररत आहेत. ते ज्या वरिल क्षेत्रात काम करित आहेत, त्या क्षेत्रातील अनेक समस्यांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यामूळे त्या ठिकाणचे प्रश्न व समस्या ते तात्काळ सोडवत आहेत.
वरिल अनेक क्षेत्रातील सक्षम नॅालेज हुलगेश चलवादी यांच्याकडे असून ते यापूढील जीवनात आणखी समाजाच्या उन्नती करिता व प्रगती करिता निस्वार्थी भावनेने काम करतील यात तिळमात्र शंका नाही. जन्म सेवेसाठी हिच टॅगलाईन मनात ठेऊन ते सातत्याने काम करित आहेत.
असे बहुआयामी, बहुगुणसंपन्न, अप्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आणि पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मा.श्री. हुलगेशजी चलवादी हे बहुजन समाज पक्षाला शहर व जिल्हाध्यक्ष म्हणून लाभले आहेत.
विकासकामे -
पुणे शहरातील कळस-धानोरी, विद्यानगर व इंदिरानगर या परिसराचे नगरसेवक म्हणून हुलगेश भैय्या यांनी अतिशय उल्लेखनिय काम केले आहे. पुणे महानगरपालिकेत काम करित असताना त्यांनी या परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे. म्हणून आज हा परिसर शहरातील सर्वात महागडा व जलदगतीने विकसित होणार ठरला आहे.
श्री. हुलगेश चलवादी यांनी सन २००२ ते २००७ या काळात नगरसेवक म्हणून भरीव कामगिरी केली आहे. -
- परिसरातील पाणी प्रश्न सोडविला.
- सुसज्ज रस्ते केले.
- ड्रेनेजची व्यवस्था केली.
- लाईटची उत्तम व्यवस्था केली.
- परिसरात उद्याने उभारली.
- घरगुती गॅस सिलेंडर वाटप.
- महिलांना प्रशिक्षण दिले.
- मोफत अर्थसहाय्य.
- मुलींना सायकलचे वाटप.
- वैद्यकीय शिबिरांचे आयोजन.
- रुग्णांना मोफत उपचार दिले.
- भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार
- मुलांना दर्जेदार शिक्षणाची सोय केली.
- स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र
- मोफत अभ्यासिका सुरू केली.
- शिलाई मशीनचे वाटप.
- बालमेळावा व बालजत्रेचे आयोजन.
- वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.
- वृक्षांचे मोफत वाटप.
- हळदी-कुंकू समारंभ.
- सहलींचे आयोजन.
- विविध मागण्यासाठी आयुक्तांना निवेदन.
- गोरगरिबांना कपडे मिळण्यासाठी मानवी भिंत.
- भारतीय संविधान राष्ट्रविकास अभियान.
- सफाई महिला कामगारांचा सन्मान.
- रक्षाबंधन कार्यक्रम.
- आंतरराष्ट्रीय योगदिन.
- शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.
- गणेशोत्सव व नवरात्रोत्सवामध्ये सहभाग.
- रक्तदान शिबिरे.
अशी मूलभूत आणि सार्वजनिक कामे करून आपल्या परिसराचा नियोजनबद्ध विकास केला आहे.
भुषविलेली पदे -
सामाजिक व व्यवसायिक -
- अध्यक्षः चलवादी एज्युकेशन सोसायटी
- अध्यक्षः चलवादी को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.पुणे.
- अध्यक्षः चलवादी मळा विकास महासंघ, महाराष्ट्र.
- अध्यक्षः चलवादी महिला विकास संस्था.
- अध्यक्षः विश्वगंगा मेडिकल फाऊंडेशन.
- अध्यक्षः भारतीय संयुक्त विहार समिती.
- संचालकः श्री.मरिअप्पा चलवादी कंन्स्ट्रक्शन कंपनी
- संचालकः सी.एम चलवादी कंन्स्ट्रक्शन कंपनी.
- संचालकः ओम चलवादी कंन्स्ट्रक्शन कंपनी.
राजकीय -
- मा.नगरसेवकः पुणे महानगरपालिका.
- मा.अध्यक्षः पुणे महानगरपालिका प्रभाग समिती.
- मा.सदस्यः महिला व बालकल्याण समिती,पुणे मनपा.
- मा.सदस्यः शहर सुधारणा समिती, पुणे मनपा.
- प्रवक्ताः राष्ट्रीय लष्कर माजी कर्मचारी समिती, पुणे.
- विशेष कार्यकारी अधिकारीः महाराष्ट्र सरकार.
शैक्षणिक -
- चेअरमनः पुणे इंटरनॅशनल प्री.प्रायमरी स्कुल
- चेअरमनः पुणे इंटरनॅशनल प्रायमरी स्कुल.
- चेअरमनः पुणे इंटरनॅशनल सेकंडरी स्कुल.
- चेअरमनः पुणे इंटरनॅशनल ज्यु.कॅालेज(आर्ट, सायन्स, कॅामर्स)
- चेअरमनः चेअरमनः पुणे इंटरनॅशनल स्कुल (सीबीएसई)
- चेअरमनः पुणे इंटरनॅशनल स्कुल (सीबीएसई) देऊदुर्ग, कर्नाटक.
- चेअरमनः पुणे इंटरनॅशनल युपीएससी व एमपीएससी इन्स्टिट्यूट.
- चेअरमनः विश्वभारती सेकंडरी स्कुल.